माझा विश्वास नाही!
कशावरही; कुणावरही
विश्वास बाळगावा तरी का?
या मार्गाच्या कुठल्याश्या
वळणावर 'घात' होऊन
विश्वासघात होण्याची 'शक्यता' ( विश्वास नव्हे!)
जिथे आहे तिथे-
विश्वास कुणावर ठेवावा?
म्हणूनच मी विश्वास ठेवत नाही...
असलाच तर आत्मविश्वास आहे
स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर,
कर्तृत्वावर वगैरे वगैरे...
कारण इथे घात होणार नाही
असा माझा 'विश्वास' आहे
मी माझा विश्वासघात करणे
शक्य नाही....
( आणि केलाच तरी तो
कळणार कुणाला ?)
-काव्य सागर
नदी वाहते...
3 weeks ago
4 comments:
आज तुझ्या बर्याच कविता वाचल्या..सॉलीड रे एकदम...माझ्या आळशीपणामुळे सगळीकडे कमेंट करत नाहिये ...पण भारीच...कवितेचा एक चांगला ब्लॉग सापडला...आभार ...
आभारी...
मी ही आळशीपणा करतो म्हणून कवितांवर आटपतो.
मला अचानक हा ब्लॉग सापडला खूपश्या कविता वाचल्या, मस्त आहोत सगळया...छानच
आभारी आहे...
Post a Comment