अणुबॉम्ब

Sunday, May 15, 2011

बघेन बघेन आणि
एक अणुबॉम्ब टाकीन म्हणतो...

म्हणजे कसं एका झटक्यात
सारे रान मोकळे
म्हणजे एकदाच या जाचातून
साऱ्यांची सुटका होईल...

हा...तसं त्या असंख्य जीवांच्या
हत्येचे पाप लागेल मला...
पण चालायचेच !...
.
.
.
...घर स्वच्छ ठेवायचे
तर हे व्हायलाच हवे...
जाम उच्छाद मांडलाय
मुंग्यांनी घरात !
काहीतरी करायलाच हवे ना...!

-काव्य सागर

2 comments:

Anonymous said...

नामदेव ढसाळांपासून वेनसडे मूव्ही पर्यंत काय काय आठवलं!


उत्तम...

Sagar Kokne said...

हाहाहा...कविता म्हणजे विक्षिप्तपणा आहे कधी कधी...

Post a Comment