कधी कधी

Monday, June 25, 2012

उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी
हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी

बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी

वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी

जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी

ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी

-काव्य सागर

2 comments:

sanket said...

वाहवा.. गझल आवडली सागररावचंद्रसाहेब !! :)

Sagar Kokne said...

साधे सोपे माझे नाव रे...धन्यवाद.

Post a Comment