तुला प्रेम करणे जमलेच नाही...

Monday, January 10, 2011

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...
- काव्य सागर

10 comments:

हेरंब said...

मस्त कविता.. मांडणीही आवडली..

Sagar Kokne said...

आभारी...बऱ्याच दिवसांनी कविता करायला वेळ मिळाला...

sanchita said...

कविता फार छान आहे...

Sagar Kokne said...

धन्यवाद संचिता

nilam said...

khup chan ahe kavita.khup sundar

Sagar Kokne said...

Thanks Nilam...

sanghapalblogspot.com said...

khup chan, manapasun kavita aavadli... Kharch premacha arthch kalat nahi....

Sagar Kokne said...

धन्यवाद...ते तर आहेच...

Anonymous said...

kupach chan

Sagar Kokne said...

आभारी...

Post a Comment