त्रिवेणी- दारू

Tuesday, January 17, 2012

तुझी नशा अफाट होती 
या दारूपेक्षा सरसच तू
.
.
.
.
तू विकली जात नाहीस हे किती बरे आहे!

*************************

मला माणसांची किंमत कळते
दारूची तेवढी कळत नाही
.
.
.
.
चष्म्याचा नंबर वाढलाय बहुतेक!

************************

ग्लासात देशी आहे की इंग्लिश
याचा विचार करत नाही मी 
.
.
.
.
जाती-धर्माच्या विरोधातच आहे मी!

*************************

ग्लास अर्धा भरलाय असंही म्हणता येतं
ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं 
.
.
.
.
म्हणा काहीही, हा ग्लास बाटलीचा गुलाम आहे !

**************************

पुन्हा भेटशील तेव्हा जाब विचारेन तुला
तू दिलेल्या दु:खाचा हिशोब लिहून ठेवलाय
.
.
.
.
बियर बारच्या मालकाकडे रेकॉर्ड आहे सगळा!

-काव्य सागर

2 comments:

sanket said...

मस्त त्रिवेण्या झाल्यात !! तिसरी आणि शेवटची एकदम खास बरं का !! :)

Sagar Kokne said...

धन्यु रे...संकेता

Post a Comment