कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

2 comments:

sanchita said...

कवी हा स्वत:साठी लिहीत असतो.त्याचे स्वतःचे एक कलानिकेतन असते, आणि त्यात तो स्वतःला घडवत असतो.खरा प्रतिभावंत कोणत्याही पदवी शिवाय स्वतःला प्रकट करत असतो.त्याचे प्रकटन त्याला मोठे करते.

Sagar Kokne said...

हो...अगदीच मान्य आहे...थोड्या तिरकसपणे लिहिली आहे कविता
गांभीर्याने घेऊ नये...
आभार!!

Post a Comment