Showing posts with label पावसाळी कविता. Show all posts
Showing posts with label पावसाळी कविता. Show all posts

आता सारे शांत शांत

Tuesday, June 29, 2010

आता कसे सारे शांत शांत होईल

मेघ दाटून येतील, पाऊस ही बरसेल
मग सारी सृष्टी निवांत होईल

जलधारांनी या धरणीची आग शमेल
मग उन्हाळी ऋतूचा सुखांत होईल

दु:खाचे मळभ जाईल, नभ सावळे होईल
मग ही धरणी सुखाचा प्रांत होईल

उन्हे कोवळी पसरतील, इंद्रधनू उतरेल
या धरेवरी मग स्वर्गाचा भ्रांत होईल

-काव्य सागर

येत्या पावसाळ्यात

Monday, October 19, 2009

येत्या पावसाळ्यात
मी भिजनार आहे

लोक हसतील ही
चेष्टा करतील ही
कोणी काहीही म्हणो
मी भिजनार आहे

आई मार देईल
सर्दी पण होईल
तरी चिंब होऊन
मी भिजनार आहे

मनातल्या तळ्यात
तळ्यातल्या पाण्यात
मनसोक्त खेळून
मी भिजनार आहे

तिच्या आठवणीत
तिच्या दुराव्यातही
फक्त तिचा होऊन
मी भिजनार आहे

स्वप्नातल्या जगात
दाट काळ्या ढगात
जगास विसरून
मी भिजनार आहे

डोळे मिटून मन
सुखाचे सारे क्षण
उरामध्ये भरून
मी भिजनार आहे
-काव्य सागर

सरी आल्या बरसत

Monday, September 14, 2009

सरी आल्या बरसत गाणे गात पावसाचे
मनातल्या ओंजळीत तळे थेंबाचे ग साचे

अशा गोजिर्‍या सकाळी नभी मेघाचे दाटणे
सांजवेळी गगनात राही भरून चांदणे
रंग पाण्यात सांडले सारे इंद्रधनुष्याचे

गोड गुपित मनीचे आज पाऊस हा सांगे
ओसरता मेघ सरी सोनपंखी ऊन मागे
धुंद होऊन गायले गाणे पहिल्या प्रेमाचे
-काव्य सागर

एक पाऊस असा ही होता की...

Sunday, September 13, 2009

एक पाऊस असा ही होता की
मेघांतून पडलाच नाही
मनातल्या सरी तरी
डोळ्यांतून सांडल्याच नाही

एक दिवस असा होता की
त्याची सांज ढळलीच नाही
वेळ उन्हाच्या आगमनाची
सूर्यालाही कळलीच नाही

एक रात्र अशी होती की
नक्षत्र नभी दिसले नाही
वार्‍याच्या शीतल झुलुकेत
चांदणे मनी हसले नाही

एक कविता अशी होती की
शब्दांचे स्वर झालेच नाही
सुटलेल्या बाणाप्रमाणे ते
परत कधी आलेच नाही
-काव्य सागर

कधी पाऊस ही येतो

कधी पाऊस ही येतो असा सुख शिंपडून
थोडा नभात दाटून थोडा पाण्यात सांडून
मन पाखरू ही गाते गाणे मधुर स्वरात
कधी हिरव्या पानात चिंब भिजल्या रानात

कधी वारा ही बेभान भरकटे आनंदात
वेडा होऊन नाचतो जल सरीच्या प्रेमात
प्रीत उनाड वार्‍याची लाजवते पावसाला
फुले प्रेमाची पालवी एका अबोल क्षणाला

कधी मेघ ही घालतात मायेची पाखरण
पाना-फुलांत होत असे रंग गंधाची उधळण
धूळ सरली पाण्यात आज ताजे जुने क्षण
मनातल्या कोपर्‍यात पावसाळी आठवण

कधी ऊन ही पसरे तेज किरणांचे घेऊन
शोभे सृष्टी हिरवी ही साज रंगाचे लेऊन
थेंब पावसाचे कधी ओल्या ओंजली होऊन
भेट श्रावणाशी होई सप्तरंगात न्हाऊन
-काव्य सागर

आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस नाद वार्‍याचा घेऊनी
गंध प्रीतीचा ग राहे सारे आभाळ भरूनी

तुझ्या प्रेमात हे वेडे मन मोरपिसी होई
थेंबाविन कासावीस जसा चातक तो होई
तुझ्या मिलनाची सख्या लागे हूरहुर मनी

सांजवेळी तुझ्या संगे दाटे रूपेरी चांदणे
माझ्या डोळ्यात लाजर्‍या तुझे हरवून जाणे
तुझ्या प्रेमाचा पाऊस मज जाई भिजवूनी
-काव्य सागर