एक पाऊस असा ही होता की
मेघांतून पडलाच नाही
मनातल्या सरी तरी
डोळ्यांतून सांडल्याच नाही
एक दिवस असा होता की
त्याची सांज ढळलीच नाही
वेळ उन्हाच्या आगमनाची
सूर्यालाही कळलीच नाही
एक रात्र अशी होती की
नक्षत्र नभी दिसले नाही
वार्याच्या शीतल झुलुकेत
चांदणे मनी हसले नाही
एक कविता अशी होती की
शब्दांचे स्वर झालेच नाही
सुटलेल्या बाणाप्रमाणे ते
परत कधी आलेच नाही
-काव्य सागर
एकटा
1 day ago
0 comments:
Post a Comment