रंग सांग माझ्या मना तुझा कोणता खरा
काळोखाचा रंग काळा की चंद्राचा गोरा
कधी लपशील तू गर्द हिरव्या रानात
कधी जपशील तू रंग प्रेमाचा मनात
निळ्या नदीच्या पाण्यात चिंब भिजून तू जाई
कधी डोळ्यात कुणाच्या भान हरवून गाई
रंग सोनेरी उन्हाचा देई नवीन पालवी
रंग चांदण्या रातीचा दीप दुखा:चे मालवी
सोनचाफ्यांच्या फुलांची ऐसी उधळण व्हावी
गुलाबाच्या पाकळ्यांनी जुनी आठवण द्यावी
रंगशील माझ्या मना कधी जळत्या आगीत
दुख:भस्म होई सारे मनातल्या त्या धगीत
बावर्या या मनाच्या सार्या बावर्या कळा
रंगभूमीत होतसे सप्तरंगांचा सोहळा
-काव्य सागर
एकटा
2 days ago
0 comments:
Post a Comment