दिवस ऊन-पावसाचे

Sunday, September 13, 2009

दिवस आलेत पुन्हा ऊन-पावसाचे
देऊन गेलेत क्षण जुन्या आठवणींचे
तुझ्या नि माझ्या सुखद सहवासाचे
मंद दरवलत्या रातरानीचे

कधी रुजले होते बीज प्रेमाचे
गुंतले होते जीव दोन वेड्या मनांचे
तू ही मान्य केले होतेस साथ देण्याचे
मग सांग झाले तरी काय त्या वचनांचे?

स्वप्ने कित्येक देऊन गेलीस बहरत्या फुलांचे
झेलले शिडकावे हळूवार तुझ्या प्रेमाच्या पावसाचे
मनाच्या कलीस का दिलेस भार सूर्य पावलांचे
उन्ह सोसवले कित्येक तिने रणरणत्या दिवसांचे

आता दिवस पुन्हा नव्या ऋतू नि नव्या पालवांचे
अबोध कळ्यांनाही आता आहेच फुलायचे
पावसासंगे साचतील पुन्हा तळे माझ्या आसवांचे
पण कोमेजले फूल पुन्हा नाही ग उमलायचे
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment