तर अजून काय हवे आहे मला ??...भाग -२

Sunday, September 13, 2009

गेल्या वेळेस तुला सांगायचे गेले राहून
शब्दच सुचले नाहीत तुझ्या डोळ्यांत पाहून
कोण जाणे तुला त्या वेळेस काय वाटले असेल ?
न बोलता ही मी खूप काही बोलून गेलो
पण त्या प्रेमाचा इशारा तुला ही कळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

कधीपासून तुझ्यावर प्रेम करत आहे ठाऊक नाही
कधीपासून तुझे वेड लागले आहे हे ही ठाऊक नाही
कसली जादू केलीस काही कळले नाही मला
नजरेने घायाळ करताना माझी दया नाही आली तुला ?
या लाजर्या नजरेनेच तुझ्या जर होकार मिळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

कधीकधी उगाचच तुला छलावेसे वाटायचे
तुझ्यावर रुसून मी दूर जाऊन बसायचे
जाणून-बुजून दुसर्‍या मुलींशी गप्पा-गोष्टी करायचे
तुझ्यापासून दुरावून मी 'ती'च्या जवळ गेल्याचे पाहून
मनातल्या मनात तू ही जराशी जळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

रोजचेच होते भेटणे तुला रोजचेच गाणे ही होते
रोजच तुला मेसेज पाठवायला माझ्याकडे बहाने ही होते
तुला ही आवडत होते हे सारे हे ठाऊक मला होते
रोज रात्री येणारा मिस कॉल आज न आल्याचे पाहून
माझ्या काळजीने तुझा जीव तळमळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

व्हॅलेन्टाईन डे ला मात्र मी सारे वाद विसरायचे
तुझा एका हास्या साठी मी काय काय करायचे
डोळ्यांत डोळे मिसळून तासन् तास घालवायचे
आता उशीर झाला आहे म्हणून जायला तर हवे...पण
माझ्या भोवतीच काही वेळ तुझे पाऊल घूटमळनार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

मी नसताना तुझे कशातच लक्ष नसते
मी असताना मात्र बोलायचे सोडून तू लाजत बसते
लाजर्या वेलीहून ही लाजरे ग मन तुझे
रंगलो कधीचाच होतो रंगात प्रेमाच्या तुझ्या
तुझ्या ही मनी रंग प्रेमाचे उधळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

पहिल्या प्रेमाचे गाणे गायले होते पहिल्या पावसात
भिजलो दोघेही होतो या प्रेमसरींच्या वर्षावात
आता चिंब होते मन तुझे अन् चिंब माझेही मन
तो पाऊस ते क्षण ओले गेले धूक्यात हरवून
पुन्हा आठवणीतच माझ्या प्रत्येक सांज ढ्लनार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

मनातल्या मनात तू ही कित्येक स्वप्ने रंगवत असशील
माझ्याच विचारात या स्वप्नांच्या जगात हरवत असशील
माझ्या सहवासाचे क्षण आठवून रात्र-रात्र जागत ही असशील
माझेही तुझ्यावर प्रेम आहे रे कळत का नाही तुला ?
तुझ्या मनीचे प्रेम न सांगता मला ही कळणार असेल
तर हेच हवे आहे मला...हेच तर हवे आहे मला...
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment