स्वप्नात मला दिसली ती सुंदरी
अवतरली जणू एखादी परी
धवल वस्त्रात देखणी तरुणी
गेली हृदय माझे घायाळ करूनी
मुख कमली उमलते पालवी
मोहक नजरेने तीर् चालवी
रेशमी केसांचा पडदा ओढूनी
चंद्रा सम मुख लपवे हरिनी
हळूवार वार्याची झुळुक मंद
दरवले गंध असा मंद धुंद
ओठांनी नाजूक शब्द तिच्या सांडे
कल्पनेने मनात खावे मी मांडे
मोहोरूनी जावे मी तिच्या स्पर्शाने
काळीज थरथरे जणू हर्षाने
जादुगीरी सारी अबोल क्षणांची
भेट सहज झाली दोन मनांची
स्वर्गातुनि उतरे धरतीवरी
स्वप्नात मला दिसली जी सुंदरी
-काव्य सागर
नवसृष्टी
1 week ago

0 comments:
Post a Comment