नकोसे वाटते आता
प्रेम तुझे अन् माझे
नकोच ते उमलते
फूल गुलाबाचे ताजे
सुकलेल्या झाडांवर
नकोत हिरवी पाने
हूरहुरत्या सांजेला
नको पाखरांचे गाणे
हविहवीशी प्रीत ती
नकोशी वाटते मला
तुझ्याविना माझी व्यथा
काय करणार तुला?
सहवासाच्या तुझ्या त्या
नको आठवणी पुन्हा
नकोनकोशा आहेत
मजला प्रेमाच्या खुणा
प्रेम तू ही केले तरी
तूच मला दुरावले
नको बोलूस पुन्हा मी
प्रेम तुझ्यावर केले
-काव्य सागर
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment