रंग माझा वेगळा

Sunday, September 13, 2009

रंगात रंगुनी ही रंग माझा वेगळा
मस्तीत डुंबण्याचा हा छंद माझा वेगळा

कोमेजल्या फुलांचे जगणे ते काय जगणे
गंधात मोगर्‍याच्या हरवून भान जगणे
काट्यात दंगण्याचा हा व्यर्थ खेळ सगळा

रमनीय पावसाचे पहिले मधुर गाणे
रिमझिमत्या स्वरांचे जे छेडिसी तराने
नवखेपणात आहे जो गंध माझा वेगळा

प्रेमात चिंब होता जे गीत ओठी यावे
ओल्या मनाने वेड्या सुरांत त्या भिजावे
स्पर्शात छेडण्याचा जो अर्थ आहे वेगळा

स्वप्नात जे न दिसती जागेपनी दिसावे
लाजुनी हासताना जे प्रेम पाझरावे
डोळ्यानी बोलण्याचा आनंद माझा वेगळा
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment