आजकाल पूर्वी सारखे जगावेसे वाटत नाही
देवा कडून आणखी काही मागावेसे वाटत नाही
आजकाल स्वप्नात रंग भरावेसे वाटत नाही
जुन्या आठवणींचे स्वप्न सरावेसे वाटत नाही
आजकाल मनापासून प्रेमाचे गाणे गावेसे वाटत नाही
अवखल झर्याच्या नादात हरवून जावेसे वाटत नाही
आजकाल सुखदुखचे गणित मांडावेसे वाटत नाही
माझे म्हणणे खरे या हट्टा साठी भाण्डावेसे वाटत नाही
आजकाल जगण्याचे नियम मोडावेसे वाटत नाही
चुका झालेले पान कळून ही खोडावेसे वाटत नाही
आजकाल उघड्या डोळ्यांनी पाहावेसे वाटत नाही
मुखवत्यांच्या खोट्या जगात राहावेसे वाटत नाही
आजकाल नवीन काही करवेसे वाटत नाही
आशावादाचे खोटे पडदे सारावेसे वाटत नाही
जमिनीत पापाचे घडे पुरावेसे वाटत नाही
मारुन पुन्हा किर्तिरूपी उरावेसे वाटत नाही
-काव्य सागर
खपलीनंतर नवीन खपली
2 weeks ago
0 comments:
Post a Comment