सरी आल्या बरसत गाणे गात पावसाचे
मनातल्या ओंजळीत तळे थेंबाचे ग साचे
अशा गोजिर्या सकाळी नभी मेघाचे दाटणे
सांजवेळी गगनात राही भरून चांदणे
रंग पाण्यात सांडले सारे इंद्रधनुष्याचे
गोड गुपित मनीचे आज पाऊस हा सांगे
ओसरता मेघ सरी सोनपंखी ऊन मागे
धुंद होऊन गायले गाणे पहिल्या प्रेमाचे
-काव्य सागर
खपलीनंतर नवीन खपली
2 weeks ago
0 comments:
Post a Comment