प्रिये तूच आहेस...

Monday, September 14, 2009

प्रिये तूच आहेस माझ्या हृदयाची राणी
तुझ्या नि माझ्या प्रेमाची ही आहे गोड कहाणी

हास्य तुझे चांदण्यांचे चमचमनारे तेज जणू
डोळ्यांतल्या छलनार्‍या नशेस तुझिया काय म्हणू
स्पर्शाने हृदय तुझ्या झाले आहे पाणीपाणी

गुंतलो असा तुझ्यात मी तुजविणा काही सुचेना
वेड्यापरि जाहलो मी छंद आगळा हा सुटेना
स्वप्नातही गात आहे प्रेमाची प्रीतधुंद गाणी
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment