तू असताना...तू नसताना...

Sunday, September 13, 2009

तू असताना नसून ही सारे असायचे
तू नसताना असून ही सारे नसायचे
तू असताना मन उगाच भरकटत बसायचे
तुझ्याकडे पाहत गालातल्या गालात हसायचे

तू असताना सारे जगच सुंदर दिसायचे
पण ते तुझ्याहून मात्र सुंदर नसायचे
तू नसताना कशा कशात लक्ष नसायचे
तुझ्या विचारात मन गुरफटून बसायचे

तू असताना खूप काही सूचायचे
पण जे बोलायचे ते मनातच राहून जायचे
तू नसताना तुझे भास मात्र असायचे
पाखराप्रमाणे अवतीभवतीच घुटमलत राहायचे

तू नसताना का म्हणून मी पावसात भिजायचे ?
ओले क्षण तुझ्या स्पर्शाचे कसे विसरायचे ?
लाख ठरवले होते सर्व बोल तुझे मिटवायचे
खरे सांगायचे तर नाही ग मला हे जमायचे

तू नसताना का म्हणून मी जगूनही मरायचे ?
रंगहीन जीवनात कुणासाठी नवे रंग भरायचे ?
तू नसताना का म्हणून दुखा:चे विष प्यावयाचे ?
आता फक्त तुझ्या धूसर आठवणीतच जगायचे...
आता फक्त तुझ्या धूसर आठवणीतच जगायचे...
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment