कधी पाऊस ही येतो असा सुख शिंपडून
थोडा नभात दाटून थोडा पाण्यात सांडून
मन पाखरू ही गाते गाणे मधुर स्वरात
कधी हिरव्या पानात चिंब भिजल्या रानात
कधी वारा ही बेभान भरकटे आनंदात
वेडा होऊन नाचतो जल सरीच्या प्रेमात
प्रीत उनाड वार्याची लाजवते पावसाला
फुले प्रेमाची पालवी एका अबोल क्षणाला
कधी मेघ ही घालतात मायेची पाखरण
पाना-फुलांत होत असे रंग गंधाची उधळण
धूळ सरली पाण्यात आज ताजे जुने क्षण
मनातल्या कोपर्यात पावसाळी आठवण
कधी ऊन ही पसरे तेज किरणांचे घेऊन
शोभे सृष्टी हिरवी ही साज रंगाचे लेऊन
थेंब पावसाचे कधी ओल्या ओंजली होऊन
भेट श्रावणाशी होई सप्तरंगात न्हाऊन
-काव्य सागर
नदी वाहते...
4 weeks ago
2 comments:
thank u sagar kokne
atleast first time u posted one poen without lovin emotion
gr8!!!!!!!!!!!!!
Welcome :)
Even if u are using poem for your project do mention author name below it.
Thank you !
Post a Comment