मी हा असा वेडा...अन् वेडी तशी ती ही...
प्रेमा सारखा वेडेपणा करतो दोघेही
अन् वेड्या सारखे प्रेम ही...
कित्येकदा मनातले सारे ओठांवर येते
प्रेमाची वेल जणू बहरून येते मनी
पण हाय! तुझी ती मोहक नजर
काय जादू करतेस माझ्यावर सांग तरी ?
स्वप्नातही पिच्छा कधी सोडत नाहीस
का ग़ अशी छलत राहतेस मला
सारे काही माहीत आहे ना तुला
मग होकार कधी देणार तू या वेड्याला ?
हरवली असशिल माझ्याच विचारात आता
तुझ्या नि माझ्या प्रेमाची स्वप्ने रंगवत
प्रेमा साठी माझ्या एवढे तरी तू करशील ना ?
प्रत्यक्षात नाही निदान स्वप्नात तरी भेटशील ना ?
-काव्य सागर
Subscribe to:
Post Comments (Atom)




0 comments:
Post a Comment