गंध चाफ्याचा काय सांगू तुला
सहवास रोजचाच आहे तुझा
साथ प्रीतीची काय मागू तुला
श्वासातच आभास आहे तुझा
सकाळ येते रोज दवात भिजून
आठवणीत तुझ्याच असतो मी निजून
स्वप्नात ही पाहतो मी स्वत:ला
तुझ्या ओल्या केसांत थेंब बनून
नसता कुणीही भवती हृदयात तू असावी
प्रेमाने गारव्याची मग शाल पांघरावी
हरवून मी जातो कसली ही जादू व्हावी
का दूर राहुनी ही जवळ तू असावी
-काव्य सागर
नदी वाहते...
3 weeks ago
0 comments:
Post a Comment