तुझी आठवण

Monday, September 14, 2009

आज अचानक तुझी आठवण आली
अगदी नकळत सहजपणे
मला वाटला मी तिला विसरणार नाही
पण विसरलो खरा सहजपणे

किती सुंदर होते ते दिवस
जेव्हा तू माझ्या जवळ होतीस
हातात हात नसला तरी
मनातली गुंफाण निरालीच होती
ओथातले शब्द ही मुक्याने
बोलून जायाचिस सहजपणे

माझ्याविणा काही सुचत नसे तुला
प्रेमात इतकी हरवली होतीस तू
मी ही तुझ्यविणा कुठे जगत होतो
वेड मला ही लागले होतेच ना
पण आयुष्याच्या एका वळणावर
वेगळे झालोच सहजपणे

अजूनही तुझी साथ हवी आहेच मला
प्रत्येक अडचणीत आधार म्हणून
अजूनही तुझा स्पर्श हवा आहेच मला
प्रत्येक जखमेवर फुंकर म्हणून
ती ओढ तो स्पर्श ते प्रेम
हरवले सारे सहजपणे

आठवणींचे अंधुक पडदे सारून
सहज स्वप्नात आलीस तू
हात हातातून निसटताना
माझ्यापासून दूर होताना
डोळ्यांतून माझ्या ही अश्रूंची धार
बरसली सहजपणे
-काव्य सागर

2 comments:

Post a Comment